पुणे शहर
वारजेत संविधान दिन उत्साहात साजरा..

वारजे : वारजेमध्ये संविधान दिन संविधान प्रास्ताविकीचे वाचन व पूजन करून साजरा करण्यात आला. विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या वतीने कार्यालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी धनंजय म्हसे, शिवाजी भोईने, बापू हांडे, नंदकिशोर बोधाई, संतोष कदम, राजीव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकीचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी बोलताना बाबा धुमाळ म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्य प्रदान केली. संविधानाची मूल्यांची जपणूक करून भारताची अखंडता राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.



