कोथरूडमध्ये संविधान दिनानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन..

कोथरूड : कोथरूडमध्ये संविधान दीनानिमित्त भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)कोथरुड मतदार संघाच्या वतीने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुक्मिणी लांडगे तसेच बाबासाहेब तूरुकमारे, केशव पवळे, अमित तुरुकमारे, मंदार जोशी, सत्येश हिवरे, मिलिंद शेजवळ, आनंद कांबळे, राम खळगे, वसंत ओहाळ, बापू वाघमारे, गंगाराम ओहाळ, नितीन खंकाळ, कल्याण शिंदे व भाजपचे संदीप खर्डेकर, पुनीत जोशी, विठ्ठल बराटे,आदी उपस्थित होते. आरपीआय (आठवले) कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खंकाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, जवान व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत कोथरूड छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरुड गावठाण, गुजरात कॉलनी, पौड रस्ता, नळ स्टॉप चौक, कर्वे रस्ता, डेक्कन छत्रपती संभाजी महाराज पुतळा अशी संविधान दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.



