राष्ट्रीय

मी मराठी माणसांचा सन्मान करणारा : बृजभूषण सिंह

पुणे : आपण मराठी माणसाविरोधात कोणतेही भाषण केलेले नाही. राज ठाकरेंना केवळ आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. मनसेचे लोक माझ्याविरोधात चुकीचा प्रचार करत आहेत. मराठी बांधवाचा मी सन्मान करतो, असे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी आपण अयोध्या दौरा करणार असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan sharan singh) यांनी त्याला जोरदार विरोध केला. तसेच राज ठाकरे यांनी माफी मागावी, मगच अयोध्येत यावं, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं. तसेच ही राज ठाकरे यांची धार्मिक यात्रा नाही, तर राजकीय यात्रा आहे. श्रीरामाचं दर्शन करायला यायचं असेल तर माफी मागा, असेही ते बोलले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा तुर्तास रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर ही हा वाद काही थांबलेला नाही. त्यानंतर आमदार रोहीत पवार (MLA Rohit Pawar) यांनी बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येतील असे म्हटलं होतं. 

बृजभूषण सिंह यांच्या एका पत्रकार परिषदेत एकाने 5 जूनपर्यंत एक जरी मराठी व्यक्ती अयोध्येत दिसला तर त्याला शरयू नदीत बुडवून मारू, असा इशारा दिला होता. त्यावेळी बृजभूषण सिंहही तिथे उपस्थित होते. तसंच त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं हसूही पाहायला मिळत होतं. त्यामुळे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी मराठी माणसाचा अवमान केल्याचे बोलले जात होते, मात्र त्यांनी आपण मराठी माणसाचा सन्मान करतो, असे म्हटलं आहे.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये