पुणे शहर

कंत्राटी कामगारांचा निर्धार मेळावा ; अनेक प्रश्ना संदर्भात न्यायालयीन लढा व रस्त्यावर उतरण्याचा निर्धार..

पुणे : पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या वतीने “श्रमिक भवन, एकलव्य सभागृह” याठिकाणी कंत्राटी कामगांराच्या प्रलंबीत प्रश्ना संदर्भात घेण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात आले नाहीत तर न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई करण्याचा निर्धार करण्यात आला.

युनियनच्या वतीने ५ ऑगस्ट २०२२ रोजी कंत्राटी कामगांराच्या प्रश्नासंदर्भात प्रचंड निदर्शने केली होती. सदर निदर्शनात मागण्यांचे निवेदन अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांना निवेदन दिले होते त्यानुसार त्यांच्या समवेत युनियन पदाधिकार्‍याबरोबर कंत्राटी कामगांराच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली होती.

या चर्चेनुसार किमान वेतनाचा फरक अदा करणे, दोन वर्षापासून थकीत ठेवलेला बोनस, घरभाडे भत्ता, रजा वेतन लागू करणे, वेतन वेळेवर व नियमितपणे अदा करणे, वेतनचिठ्ठी मिळणे, ओळखपत्र देणे, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकिय सहाय्य योजनेचा निधी पूर्ण क्षमतेने भरणे, कोविडच्या कालावधीत कर्तव्य बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या कंत्राटी कामगांराच्या वारसाना नुकसान भरपाई देणे, ठेकेदार जरी बदलला तर कंत्राटी कामगार बदलू नये ईत्यादी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी युनियनच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Img 20220916 wa0061

सदर मेळाव्यात युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी मार्गदर्शन करत असताना म्हंटले की,”कंत्राटी कामगांराच्या प्रलंबीत प्रश्नाविषयी प्रशासनाबरोबर चर्चा झाल्याप्रमाणे शिवाय दोनवर्षा पासून थकवलेला बोनस, घरभाडे भत्ता व रजा वेतन व किमान वेतन देणे व फरकाची रक्कम अदा करणे विषयी ठोस निर्णय घेतला नाही तर आम्ही न्यायालयात कायदेशीर लढाई लढण्यात येईल.

पुढे ते म्हणाले हे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहाणार नाही. कोणत्याही कामगांरानी बारा महिने काम केले तर तेराव्या महिन्याचे वेतन बोनस म्हणून देणे, मुळवेतनात घरभाडे देणे, रजावेतन देणे हे कायद्याने बंधनकारक आहे. कामगांराना कायद्याने दिलेले हक्क व अधिकार कोणीही सहजरित्या नाकारू शकत नाही. कामगार कायद्याने प्राप्त झालेले हक्क व अधिकार टिकविण्यासाठी कामगांरानो एकजुटीत व संघटीत मान्यताप्राप्त युनियनच्या नेतृत्वाखाली सज्ज व्हा” तसेच हे सर्व प्रश्न दिवाळीपूर्वी सोडवले नाही तर लढा तिव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

Img 20220910 wa0003

सदर निर्धार मेळाव्यात युनियनचे पदाधिकारी कॉ. चंद्रकांत गमरे, कॉ.मधुकर नरसिंगे, कॉ. रोहिणी जाधव, कॉ. वैजीनाथ गायकवाड, कॉ. जयश्री भिसे, कॉ. शोभा बनसोडे, कॉ. निलेश चव्हाण, जेष्ठ सल्लागार कॉ. प्रकाश हुरकडली, कॉ. प्रकाश चव्हाण, झोनल अध्यक्ष कॉ. तानाजी रिकीबे, रमेश पारसे, अजित मेंगे, धनजंय आयवळे, भरत ठोंबरे, ओकांर काळे,यांनी मार्गदर्शन केले. तसेच सदर मेळव्यात युनियनचे सर्व पदाधिकारी, सचिव कार्यकर्ते व दोन हजार कंत्राटी कामगार उपस्थित होते. मेळाव्याचे सुत्रसंचलन कॉ. राम अडागळे यांनी केले व समारोप कॉ. प्रकाश चव्हाण यांनी केले.

तीन तासात साजरे केले बारा हिंदु सण ; दिला हिंदु संस्कृतीचा ठेवा जपण्याचा संदेश

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये