पुणे शहर

चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोथरूडमधील वंचित लेकींना वात्सल्याची भेट..

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आनंदाचे क्षण साजरे करु न शकलेल्या कोथरूडमधील वंचित लेकींना वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून ड्रेसचे वाटप केले.

या कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश महिला आघाडी चिटणीस वर्षा डहाळे, नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेवक जयंत भावे, वात्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि कोथरूड मंडल सरचिटणीस प्रा.अनुराधा येडके, राजेंद्र येडे, राज तांबोळी, चंद्रकांत पवार, कोथरूड मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षा पल्लवी गाडगीळ, जानवी जोशी, मुग्धा दत्ता-जोशी, जयश्री तलेसरा, दीपाली गुर्जर, मृदुला उपगडे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20210522 wa0203

कोरोनाचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बसला. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून त्यांना कोणत्याही प्रकारे सण-समारंभ साजरा करता आला नाही. परिणामी त्यांच्या मुलांनाही या आनंदाच्या क्षणापासून मुकावे लागले. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वंचित घटकांना मदतीचा एक हात देण्याचे ठरवले होते.

त्यानुसार आज  चंद्रकांत पाटील यांनी वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरूडमधील वंचित लेकींना ड्रेस मटेरियल चे वाटप केले व त्यासोबत शिलाई चा खर्च ही दिला. ही अनोखी भेट मिळाल्याने सर्व मुलींनी आनंद व्यक्त करत, चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये