पुणे शहर

गुडलक चौकातील कलाकार कट्टा स्थलांतरित करू नका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची प्रत्यक्ष पाहणी करून, कलाकारांशी चर्चा 

पुणे : गेल्या काही वर्षांपूर्वी कलाकारांसाठी एक चांगले व्यासपीठ म्हणून गुडलक चौकातील कलाकार कट्टा साकारण्यात आला आहे. मात्र, या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या कारणावरून भाजपच्याच नगरसेवकांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना कलाकार कट्टा स्थलांतरीत करण्यासंबधी लेखी पत्र दिले आहे. त्या अनुषंगाने नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून, स्थलांतरामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या अडचणी, कलाकारांवरील परिणाम, आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम याबाबत उपस्थित कलाकारांशी चर्चा  केली. 

कलाकार कट्ट्या मुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगत हा कट्टा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी भाजप नगरसेवक पुनीत जोशी यांनी केली आहे. यावर नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी तातडीने कलाकार कट्टा येथे प्रत्यक्ष पाहणी करून हा कट्टा स्थलांतरित होणार नाही असे कलाकारांना आश्वस्त केले 

नगरसेवक हर्षवर्धन मानकर म्हणाले,”कलाकार कट्टा हे पुण्यातील सांस्कृतिक वारसा आहे. याचे स्थलांतर म्हणजे कलाकारांच्या आणि कला रसिकांच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो. नगरपालिकेने स्थानिक नागरिकांचा आणि कलाकारांचा सल्ला घेतल्याशिवाय अशी पावले उचलू नये.

तसेच याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीम. सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पुणे मनपा आयुक्त श्री. नवल किशोर राम यांना स्थलांतर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी पत्र व्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Img 20251125 wa01788344877527023851533

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये