पुणे शहर
डॉ.मुकुंद भालेराव यांचे निधन

पुणे : डॉ.मुकुंद मनोहर भालेराव (वय ८६) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ,सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भालेराव यांचे ते वडील होते.
त्यांनी बी जे मेडिकल कॉलेज मधून वैद्यकीय पदवी (MBBS) घेऊन ,त्यानंतर ते इंटरेनशीप साठी धुळे जिल्ह्यातील पहिले डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ससून मध्ये नेमणूक झाल्यावर 10 ते 15 वर्ष काम करून राजीनामा देऊन त्यांनी जवळच नरढाना गावी की जे एक छोटेसे खेडेगाव होते.तिथे प्रथितयश डॉक्टर म्हणून नाव कमविले त्यात त्यांच्या पत्नीची कै सौ अंजली भालेराव यांची साथ त्यांना मिळाली कारण त्या स्वतः एक परिचारिका होत्या ,त्या काळी त्यांचा प्रेमविवाह झाला होता , जिथे पती तिथे सती असे म्हणत तोला मोलाची साथ त्यांच्या पत्नीने त्यांना दिली होती.



