पुणे शहर

मामासाहेब मोहोळ शाळेत केलेल्या विकासकामांमुळे शाळेने ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात प्रथम क्रमांक पटकावला- दीपक मानकर 

प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर मधील केळेवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा 

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे यांच्या प्रचारार्थ केळेवाडी परिसरातील अमरज्योत मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, दुर्गामाता प्रतिष्टान, राजमुद्रा प्रतिष्टान, हनुमाननगर येथील मिलिंद संघ तसेच जयभवानीनगर परिसरात माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरा सभा संपन्न झाल्या.

संपूर्ण पॅनल हे कोपरा सभेद्वारे नागरिकांशी संवाद साधत असून त्याला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नागरिकांच्या सोबत असल्याचे चित्र दिसत आहे. 

Img 20251125 wa01782121520512185783132

यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर म्हणाले, हर्षवर्धन हा मागील आठ ते दहा वर्षापासून पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन सह मुलभूत गरजांची कामे करीत आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, मुला-मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मामासाहेब मोहोळ शाळेत केलेल्या विकासकामांमुळे माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रभागातील नागरिकांच्या आयुष्यातील जीवनक्रम चांगला असला पाहिजे यासाठी सर्वोतोपरी मदत ही हर्षवर्धन मानकर यांच्याकडून दिली जात आहे.

हर्षवर्धन दीपक मानकर म्हणाले, हनुमाननगर,केळेवाडी यासह प्रभागात केलेले रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, प्रभाग हा पूर्णपणे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी घेतलेल्या कचरा गाडी व स्वखर्चाने स्वच्छतेसाठी ठेवलेले कर्मचारी, आरोग्याच्यादृष्टीने नागरिकांसाठी शहरी गरीब योजनेची पूर्तता करून देणे, महिलांसाठी राबविण्यात आलेले व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, नव्याने तयार होत असलेले प्रसूतिगृह, मामासाहेब मोहोळ शाळेत केलेली विकासकामे याची माहिती दिली. प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन मानकर यांनी केले.   

स्थानिक नागरिक संगीता बाळकृष्ण अहिरे यांनी सांगितले काही वर्षापूर्वी त्यांची मुलगी सपना अहिरे हिला मेंदूच्या आजारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यावेळी दीपकभाऊ मानकर यांना भेटले आणि त्यांनी माझ्या मुलीला दवाखान्यात दाखल करण्यापासून दवाखान्याचे बिल भरेपर्यंत सर्व मदत केली. आज त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून तिचा संसार चांगला सुरु आहे. हे सगळे दीपकभाऊ मुळे शक्य झाले असे त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये