पुणे शहर

यंदा पुणे शहरात बालचिमुकल्यांना दिवाळीत किल्ले साकारण्यासाठी मातीच उपलब्ध नाही!

बालचिमुकल्यांच्या शिवकालीन किल्ले बनविण्याच्या परंपरेवर मातीअभावी संकट; महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.- मनविसेचे प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजिया यांची मागणी 

पुणे : दिवाळी म्हटले की लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकर्षण असते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले साकारण्याचे. मात्र यंदा पुणे शहरातील अनेक भागांमध्ये दिवाळीनिमित्त किल्ले बनविण्यासाठी माती मिळत नसल्याची समस्या नागरिक आणि पालकांकडून समोर येत आहे.

Fb img 1793342454540

एकीकडे आपण नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशांत कनोजिया म्हणाले, इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि स्वराज्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो; तर दुसरीकडे या परंपरेसाठी आवश्यक असलेली मातीच उपलब्ध होत नसेल, तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे.पुणे महानगरपालिकेने याकडे केवळ माती विक्रीचा प्रश्न म्हणून न पाहता सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेशी जोडलेला विषय म्हणून पाहावे.

Img 20261031 wa00071548813801118469897

 प्रमुख मागण्या :

1. पुणे शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत किल्ल्यांसाठी माती उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत केंद्र सुरू करावे.

2. पर्यावरणाला हानी न पोहोचवता बांधकामातील स्वच्छ अतिरिक्त माती संकलित करून नागरिकांना उपलब्ध करून द्यावी.

3. शाळा, मंडळे आणि बालगोपाळांसाठी माती मोफत किंवा माफक दरात उपलब्ध करून द्यावी.

4. दिवाळीपूर्वी माती वितरणाचे नियोजन करून त्याची माहिती महापालिकेने प्रसिद्ध करावी.

1002016625

प्रशासनाला सवाल :

पुणे शहरात मोठमोठे विकासप्रकल्प आणि बांधकामे सुरू असताना मुलांना शिवरायांचे किल्ले बनवण्यासाठी मूठभर माती मिळू नये, ही दुर्दैवी बाब नाही का? असा सवाल प्रशांत कनोजिया यांनी उपस्थित केला आहे.मुलांच्या हातातील माती हिरावून घेऊ नका; कारण याच मातीतून उद्याच्या पिढीमध्ये शिवरायांचा इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा रुजते! असेही कनोजिया म्हणाले.

Fb img 17931033768477166369956517137623

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये