पुणे शहर

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर असताना पुणे मनपाचा दीपोत्सव कशासाठी ?

शनिवार वाडा दीपोत्सव रद्द करून निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरा – प्रशांत कनोजिया

पुणे : महाराष्ट्रातील विविध भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करीत आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिकेने दीपोत्सवाच्या आयोजनासाठी सार्वजनिक निधी खर्च करण्याचा घेतलेला निर्णय पुनर्विचार करण्यासारखा आहे.

Img 20261106 wa0138


एका बाजूला राज्यातील नागरिक पाण्यासाठी संघर्ष करीत असताना दुसऱ्या बाजूला सार्वजनिक पैशातून उत्सवावर खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत कनोजिया यांनी उपस्थित केला आहे.

आमचा विरोध दीपोत्सव किंवा दिवाळीच्या सणाला नसून, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक निधीच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमाला आहे. उत्सवापेक्षा नागरिकांचे पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना मदत आणि दुष्काळग्रस्तांना दिलासा देणे अधिक महत्त्वाचे आहे.

Addaheading 20261106 220105 0000

त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेला दीपोत्सव तात्काळ रद्द करावा, त्यासाठी मंजूर केलेल्या निधीचा तपशील जाहीर करावा आणि शक्य असलेला निधी दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी वळविण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Img 20261029 wa00153082406691295416280

“शहरात दिव्यांची रोषणाई करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांच्या घरात शिदा देणे  आज अधिक महत्त्वाचे आहे!” अशी भूमिका प्रशांत कनोजिया यांनी मांडली असून, या मागणीवर तातडीने निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

Addaheading 20261106 220853 0000
Screenshot 20261106 165031 instagram
Screenshot 20261106 164537 instagram
Fb img 1793984255146
Img 20261106 wa0335
Screenshot 20261106 165230 instagram
Fb img 1793964315876
Img 20261031 wa0190
Img 20261106 wa0242
Fb img 1793983305023

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये