पुणे शहर

पुणेकरांनो, लक्ष द्या! लक्ष्मीपूजनाला मेट्रोच्या वेळा बदलणार; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

पुणे : दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने रविवारी, 8 नोव्हेंबर रोजी मेट्रोच्या दैनंदिन वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, रात्री मेट्रो सेवा नेहमीपेक्षा लवकर थांबवण्यात येणार आहे.

प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेत करावे, यासाठी ‘महामेट्रो’ प्रशासनाने हे नवीन वेळापत्रक जारी केले आहे.

Screenshot 20261029 193142 chrome

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6:00 वाजता सुरू होईल आणि रात्री 8:00 वाजता पूर्णपणे बंद केली जाईल. एरवी मेट्रो रात्री 11:00 वाजेपर्यंत सुरू असते, मात्र या दिवशी रात्री 8:00 ते 11:00 या वेळेत एकही मेट्रो धावणार नाही. लक्ष्मीपूजनाच्या रात्री प्रवाशांची संख्या कमी असते; तसेच मेट्रो कर्मचाऱ्यांनाही आपल्या कुटुंबासोबत सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Img 20261107 wa00041351533853315325461

लक्ष्मीपूजनाच्या रात्री बाहेर पडणाऱ्या सर्व पुणेकरांनी वेळापत्रकातील हा महत्त्वपूर्ण बदल लक्षात घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन महामेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, सुरुवातीला महामेट्रोने सायंकाळी 6:00 वाजेपर्यंतच गाड्या चालवण्याचा विचार केला होता. परंतु, प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आणि त्यांच्या मागणीचा विचार करून सेवेची वेळ रात्री 8:00 वाजेपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे रविवारी सकाळी 6:00 ते रात्री 8:00 या कालावधीत पुणेकरांना मेट्रोचा प्रवास करता येईल.

Img 20261031 wa0190

हा बदल फक्त एका दिवसापुरताच मर्यादित आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी, 9 नोव्हेंबरपासून पुणे मेट्रोची वाहतूक पुन्हा सुरळीत होणार आहे. सोमवारी सकाळी 6:00 वाजेपासून नेहमीप्रमाणे रात्री 11:00 वाजेपर्यंत मेट्रो सेवा नियमितपणे सुरू राहील.

Addaheading 20261106 220105 0000
Img 20251022 wa0324
Img 20261106 wa0242
Img 20251020 wa0016282297746091081089016679
Img 20251017 wa0416
Addaheading 20261107 202853 0000
Addaheading 20261107 085150 0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये