राष्ट्रीय

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, 10 दिवसांत साडेसहा रुपयांनी महाग

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलीटर 80 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या 10 दिवसांत इंधन तब्बल 6 रुपये 40 पैशांनी महागलं आहे.

मुंबईत एक लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी तब्बल 116 रुपये 72 पैसे आणि 100 रुपये 94 पैसे मोजावे लागणार आहेत. 22 मार्चपासून आतापर्यंत नवव्यांदा इंधनाच्या दरात ही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईमुळे रोजचा खर्च आटोक्यात ठेवणे अवघड झाले आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये