पुणे शहर

प्रमोद शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (श प.) पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा

कोथरूड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सदस्य व राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड मतदारसंघाचे माजी अध्यक्ष
प्रमोद शिंदे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. येणारी निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन लढवणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कालच पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.  आज प्रमोद शिंदे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना पाठवला आहे.

Img 20251125 wa00126624322614302660332

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाने घेतलेल्या सरकार विरोधात घेतलेल्या अनेक आंदोलनात सहभागी होत या कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद वाढवली. राष्ट्रवादीत दोन भाग पडल्यानंतर शरद पवार यांच्या बरोबर राहिलेल्या कार्यकर्त्यांनी निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत पक्षाची बाजू खंबीरपणे न डगमगता मांडत संघर्ष केला.

या येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळेल असे वाटत असताना आता दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे पक्षासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते निराश झाले असून त्यातून राजीनामा सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. 

प्रमोद शिंदे यांनी दिलेले राजीनामा पत्र

Img 20251225 wa03531764823241491008195

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये