इंधन दरवाढी विरोधात पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम व निषेध आंदोलन..

पुणे : पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने डेक्कन गूडलक चौक येथील पेट्रोल पंपावर निषेध आंदोलन करून स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. Signature campaign and protest agitation of Pune City and District Student Congress against fuel price hike
यावेळी पुणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश NSUI अध्यक्ष अमीर भाई शेख, उपाध्यक्ष उमेश कंधारे, पुणे शहर NSUI अध्यक्ष भूषण रानभरे, अभिजीत हलदेकर, संदेश तेंबुर्णे, राहुल सोनावणे आदी उपस्थित होते. पुणे शहर उपाध्यक्ष प्रफुल्ल पिसाळ, कोथरुड विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष राज गोविंद जाधव, शिवाजीनगर अध्यक्ष प्रसन्न मोरे, अविनाश सोळुंके यांनी आंदोलनाचे आयोजन केले होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त केला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती जनता हैराण असताना वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.




