१ मे पासून लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने लसीकरण केंद्र वाढवावीत व योग्य नियोजन करावे : धुमाळ

पुणे : १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदारांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करते. १ मे पासून लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन अगोदरच प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याची गरज असल्याचे विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी म्हंटले आहे. Considering the rush for vaccination from May 1, the administration should increase the number of vaccination centers and make proper planning
१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. सद्य परिस्थितीत लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. लस नाही मिळाली तर नागरिकांना परत जावे लागत आहे. १ तारखेपासून लसीकरण केंद्रावर आणखी गर्दी वाढणार आहे. त्यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून आवश्यक कर्मचारी वर्गाचे नियोजन सत्ताधारी भाजपने व प्रशासनाने आताच करून ठेवावे अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी कली आहे.

धुमाळ यांनी म्हंटले आहे की पुणे शहरातील कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या कंट्रोलच्या बाहेर सर्व गोष्टी गेल्या आहेत. आताच लसीकरण केंद्रावर लस संपली की केंद्र बंद करून नागरिकांना परत पाठवावे लागत आहे. १ मे पासून केंद्रांवर गर्दी वाढणार असून तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. केंद्रावर गर्दी वाढली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा ही धोका आहे, त्यामुळे लसीकरण केंद्र वाढवून आवश्यक तेवढा कर्मचारीवर्ग त्यासाठी तयार ठेवणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.



