वृंदाताई दिवाण व राजेंद्र वाघ यांना मायमराठी पुरस्कार प्रदान..

साहित्यिक कट्टा वारजे च्या वतीने पुरस्काराचे वितरण
वारजे : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्यिक कट्टा वारजे च्या वतीने देण्यात येणारा मायमराठी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका वृंदाताई दिवाण व कवि राजेंद्र वाघ यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्यिक कट्टा वारजे व पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात मायमराठी पुरस्कार वितरणा बरोबरच मराठी माध्यम शाळांच्या मुख्यध्यपाकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते.
यावेळी बाएफ संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे, ज्येष्ठ साहित्यिका माधवी वैद्य, दिपाली धुमाळ, बाबा धुमाळ डी. के. जोशी, नंदकुमार बोधाई, मानसी नलावडे, महेश कुलकर्णी, सुरेश जाधव, उदय कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदकुमार बोधाई यांनी केले तर आभार डी. के. जोशी यांनी मानले.










दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला वारजे साहित्यिक कट्टा वारजे परिसरात सातत्याने साहित्य विषयक कार्यक्रम घेऊन मराठी भाषा संवर्धनाचे काम करत आहे. काव्य स्पर्धा, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, नवोदित साहित्यिकांचे पुस्तक प्रकाशन कार्यक्रम, वाचनालयाची निर्मिती, लहान मुलांसाठी बाल साहित्यिकांचे कार्यक्रम, असे विविध कार्यक्रम राबवून मराठी साहित्य चळवळीचे काम केले जाते म्हणूनच हा वारजे साहित्य कट्टा सुरू करणाऱ्या दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांचे साहित्य प्रेमी लोकांकडून कायम करण्यात येते.






