कोथरूड मध्ये शिवसेना (उबाठा) च्या प्रचारार्थ युवक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) मैदानात

पुणे : कोथरूड मध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात घुमू लागले आहे. अश्यातच महाविकास आघाडी चे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मविआ चे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)कोथरूडचे अध्यक्ष गिरीश गुरनानी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी हे जोमाने प्रचार करताना कोथरूडकरांना दिसत आहेत. सकाळी “मॉर्निंग वॉक” साठी आलेल्या नागरिकांना पत्रक वाटण्याचे व मोकाटेंची भूमिका पटवून देण्याचे कार्य ते करताना दिसतात.
मागील काही दिवसात परमहंस नगर, म्हातोबा टेकडी, आयडियल कॉलनी मैदान, थोरात उद्यान, ए आर ए आय टेकडी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान डहाणूकर कॉलनी, आशिष गार्डन समोरील डीपी रोड, जीत मैदान या व अशा अनेक ठिकाणी युवक राष्ट्रवादी कोथरूडच्या वतीने गिरीश गुरनानी आणि व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रचाराचे कार्य केलेले आहे.
अश्यातच त्यांच्याशी बोलताना त्यांनी कोथरूड मध्ये प्रचंड बहुमताने आपले स्थानिक महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत काका मोकाटे निवडून येतील व महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येईल असा आत्मविश्वास दर्शविला.










