कोथरुड

रस्त्याच्या कडेने कचरा पडू नये यासाठी कोथरूडमधील कंत्राटी सफाई कर्मचारी महिलांचा अनोखा उपक्रम..

कोथरूड : रस्त्याच्या कडेने नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागातील डहाणूकर कॉलनी हजेरी कोठीतील कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेने रांगोळी साकारून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्याचा अभिनव उपक्रम राबवला. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२३ अन्वये हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या कडेने असलेल्या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनातून नागरिक कचरा फेकून रस्ता अस्वच्छ करत असतात. या प्रकारामुळे या रस्त्याने फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार थांबावा यासाठी सदर उपक्रमामध्ये गेली पंधरा वर्षापासून काम करणाऱ्या महिला कंत्राटी सेविकांनी सकाळच्या प्रहरीचे सफाईचे काम उरकून रस्त्याच्याकडेला रांगोळ्या काढत स्वच्छतेचा संदेश दिला.

रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्यामुळे डुकरांचा सुळसुळाट देखील वाढला होता. डुकरांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात देखील घडत होता. स्थानिक नागरिकांच्या समस्येची गंभीर दखल घेऊन या भागात काम करणारे मोकादम वैजीनाथ गायकवाड यांनी मागील काही वर्षापासून कमिन्स कंपनीच्या रस्त्यावर दररोज सफाई करण्यासाठी महिला सेविकांची नेमणूक करून सफाई केली जाते व पडणारा कचरा रोजच्या रोज उचलण्याची व्यवस्था करण्यात येते. तसेच कचरा पडणाऱ्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या व झाडे लावून सुशोभीकरण देखील करण्यात आले. रस्त्यावर पडणार्‍या कचर्‍यातील पत्ते शोधून चार वर्षाच्या कालावधीत ५६ हजार रुपये दंडात्मक कारवाई करून शुल्क वसूल करण्यात आले. या रस्त्यावर कचरा पडू नये यासाठी सातत्याने केला जातो.

आयपीएल मध्ये सर्वाधिक रक्कम मिळालेले खेळाडू कोण?

आता गेली पंधरा दिवस झाले या रस्त्यावर झाडण काम करणाऱ्या कंत्राटी सेविका मंडाबाई जानराव, वृंदावनी वाघमारे व मंगल कदम या तिघींनी “आपण आता रस्त्यावर सडा रांगोळी काढून स्वच्छतेचे सुविचार लिहून नागरिकांचे प्रबोधन करण्याचा जनू विडाच उचलला आहे. त्या दररोज स्वतः रांगोळी विकत आणून रांगोळी काढून जनजागृती करतात. स्वच्छता करणाऱ्या महिलांनी रस्त्यावर काढलेल्या सुंदर रांगोळी जाणारे येणारे नागरिक पाहातात व कौतुकही करतात.

सदर रस्त्यावर नागरिकांनो कचरा टाकून मातृभूमी घाण करू नका, भारत भूमीवर थुंकून व उघड्यावर शौच व लघवी करून घाण करू नका, ओला व सुका कचरा वर्गीकरण करा, पर्यावरणाचे रक्षण करा, स्वच्छता शिका – आरोग्य जिंका, स्वच्छ भारत – निरोगी भारत, स्वच्छता एक बडा अभियान है, आप भी दे अपना योगदान !, स्वच्छता ही सेवा है, गंदगी एक जान लेवा है!, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे हरित पुणे, आपला परिसर स्वच्छ ठेवा आपल्या आरोग्याचे रक्षण करा, स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मध्ये पुणे शहराला नंबर एक नंबर मध्ये आणण्यासाठी आपले योगदान करा”. अशी जनजागृती या कंत्राटी महिला करत आहेत. रस्त्यावर सडा व रांगोळी काढण्याची मोहिम कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आरोग्य निरीक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे यांच्या निरीक्षणाखाली मुकादम वैजीनाथ गायकवाड व अण्णा ढावरे यांनी परिश्रम घेतले.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये