पुणे शहर

EXCLUSIVE VIDEO : म्हात्रे पूल ते राजाराम पूल हॉटेल्स, लॉन्सवर अतिक्रमणविरोधी कारवाई

पुणे : महापालिकेकडून अतिक्रमणावरील कारवाईला वेग देण्यात आल्याचे दिसत आहे. शहरातील म्हात्रे पूल ते राजाराम पूल यामधील डीपी रोडवरील अतिक्रमण केलेल्या हॉटेल्स आणि अन्य दुकानांवर महापालिकेच्यावतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये काही लॉन्स आणि मंगल कार्यालयांचा देखील समावेश आहे.

सिंहासन NEWS EXCLUSIVE VIDEO

महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांसह आणि पोलिसांसह या ठिकाणी दाखल झाले. शिवाय, मोठ्या प्रमाणावर बुलडोझर, क्रेनसह अतिक्रमण पाडण्यासाठीची यंत्रणा देखील या ठिकाणी आणली गेली. महापालिकेच्या या कारवाईमुळे डीपी रोडवरील एका बाजूचा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या रोडवर अनेक छोटी-मोठी हॉटेल्स, लॉन्स आणि मंगल कार्यालयं आहेत. लगीनसराईत त्यांचं बुकींग देखील फुल्ल झालेलं आहे अशावेळी या कारवाईमुळे या मंगल कार्यालयांच्या मालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. सायंकाळी तर पुणेकरांची या ठिकाणच्या हॉटेल्सवर मोठी गर्दी दिसून येते. मात्र आज सकाळपासूनच या हॉटेल्सवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू झाली. काही स्थानिकांनी सांगितल्यानुसार अतिक्रमण करणाऱ्या लोकांना या कारवाईच्या 24 तास अगोदर सूचित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज सकाळीच सहा वाजता महापालिकेचं पथक या ठिकाणी कारवाईसाठी दाखल झालं.

Fb img 16504250884693500455106425966004
Img 20220419 wa0007968353280963622575
Img 20220419 wa0026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये