“तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा

मुंबई : बुलढाण्यात शनिवारी शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालेला आपल्याला बघायला मिळाला. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच वादग्रस्त वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला धमकीवजा इशारा देखील दिला आहे. यावरून शिवसेनेने देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभावेळी शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. त्यावरून राज्यात शिवसैनिकांकडून संतप्त व्यक्त केला जात आहे. यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारा दिला आहे ते म्हणाले की ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबाबत पातळी सोडून बोलत असतील तर चुन चुन के गिण गिण के मारे जायंगे, त्यावरून शिवसेना नवीन पनवेल उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी त्यांना आव्हान दिलं आहे.
प्रशांत जाधव यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं आहे की, यापुढे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तोंड सांभाळून वापरावे नाही तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू असा इशारा त्यांनी संजय गायकवाड यांना दिला आहे. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात सध्या राजकीय संघर्ष टोकाला पोहचला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे बडे नेते बंडखोर आमदारांवर वारंवार निशाणा साधताना दिसत आहेत. तर शिवसैनिक आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलाचं गाजत आहेत. तसेच प्रशांत जाधव यांच्या आव्हानाला आता संजय गायकवाड काय प्रत्युत्तर देणार ते पण आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.






