पुणे शहर

लेखनात समाजाचे प्रतिबिंब दिसले पाहिजे – विजय शेंडगे

‘परतीच्या वाटेवर ‘ चारोळी संग्रहाच्या प्रकाशन.

पुणे : “कवींनी लिहिण्याआधी वाचायला हवं. तुम्ही किती लिहिलं? या पेक्षा किती सकस लिहिलं हे अधिक महत्वाचं आहे. समाज घडविण्याची ताकद लेखनात आहे. परंतु त्यासाठी लेखनात समाजाचे प्रतिबिंब दिसायला हवे. वाचकांना रुचेल समजेल असे लिहायला हवे.” असे मत विजय शेंडगे यांनी व्यक्त केले. निमित्त होते कवी सीताराम नरके यांच्या ‘परतीच्या वाटेवर ‘ या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनाचे.

यावेळी सुरेश पाटोळे, डॉ. मदन कोठुळे , युवराज दिसले, सूर्यकांत तिवडे आदि मान्यवर उपस्थित होते. ज्ञानाई फाऊंडेशनच्या हेवन पार्क, महंमदवाडी येथील  सभागृहात राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी कवी सीताराम नरके यांचा ६५ व्या वाढदिवसानिमित्त गायन, खुले कवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले होते.

Img 20221126 wa02123601048173337149659

अर्चना भट यांच्या गायनाने सभा गायनाला सुरवात झाली तर गझलकार बबनराव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली खुल्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मसूद भाई पटेल आणि बाबा ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कवी संमेलनात  चाळीस कवींनी आपल्या रचना सादर केल्या .

सम्राट अशोक या नाटकातील कलाकारांचा सन्मान ज्ञानाई फाऊंडेशन वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मच्छिंद्र नरके यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्राचे रानकवी जगदीप वनशिव आणि प्रेमकवी सुरेश धोत्रे यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. चारुदत्त नरके यांनी आभार मानले .

Fb img 16489630582138265562594746159944
Img 20221212 wa00085709390265651809047
Img 20221212 wa00108437452048883631406
Img 20221212 wa0009708481580199560968

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये