पुणे शहर

राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियान वाहनाचे अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘सभासद नोंदणी अभियान वाहनाचे’ लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. वडगावशेरी विधानसभाचे आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाने ‘सभासद नोंदणी अभियान वाहन तयार करण्यात आले आहे.

मागील आठवड्यात या अभियानाच्या माध्यमातून वडगावशेरी विधानसभेते वेगवेगळ्या ठिकाणी सभासद नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वडगाव शेरी मतदार संघाचे अध्यक्ष कुलदीप शर्मा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अजित पवार पुणे दौऱ्या त्यांची भेट घेऊन सभासद नोंदणीची पुस्तके पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे व कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर यांनी दादांकडे सुपूर्द केली.पवार यांनी अभियानाअंतर्गत केलेल्या कामाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षातील विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये