पुणे शहर
मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून पुण्यात मोठी जबाबदारी

पुणे : भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभा निवडणूक प्रमुखपदाच्या जबाबदारीसोबत भाजपाच्या ‘महाविजय २०२४’ साठी पुणे लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांची समन्वयक म्हणून जबाबदारी पार्टीने दिली असून या नव्या जबाबदारीचे पत्र मोहोळ यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले.
मोहोळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने देशभर ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्यात येत असून या अभियानाची ‘महाराष्ट्र राज्य संयोजक’ म्हणूनही जबाबदारी पार्टीने दिली असून या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निश्चितच कार्यरत असेल.













