कोथरूडमधील नवजवान मित्र मंडळाने साकारला ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा

देखाव्याची संकल्पना मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
पुणे : कोथरूडमधील नवजवान मित्र मंडळाने यावर्षी ३८व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाकडून वर्षभरात अनेक सामाजिक, लोकोपयोगी व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर, शिवजयंती, दहीहंडी, श्री कृष्ण जन्म, गडभ्रमंती, सार्वजनिक होळी, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन , गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वारकऱ्यांना फराळ वाटप तसेच दुष्काळ , पूरग्रस्त भागातील लोकांना मदत असे सातत्यपूर्ण उपक्रम मंडळ राबवित असते.
दमदाटी न करता मिळेल त्या ऐच्छिक वर्गणीतून मंडळ वर्षभरातील कार्यक्रम साजरे करते. त्याचीच दखल घेत लोकमत समूह व रिलायन्स ट्रेंड्स कडून घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला पुण्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पश्चिम विभागात मंडळाला द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
















