पुणे शहर
शिक्षक संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेंद्र दळवी यांचा सत्कार

वारजे : यावेळी शिक्षक प्रथम पाटील , सुनील कांबळे, अरुण पाटील उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, शाल, श्रीफळ देऊन दळवी यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
शिक्षक संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेंद्र दळवी यांचा पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महेंद्र दळवी यांनी संघटनेवरती सात वर्ष सरचिटणीस म्हणून काम पाहिले असून शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. पुढील काळात शिक्षकांसंबंधी असणारे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहतील असा विश्वास बाबा धुमाळ यांनी यावेळी केला.













