पुणे शहर

चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोथरुडकरांची दिवाळी गोड!नाममात्र दरात फराळ उपलब्ध उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

जवळपास १५ हजार किलोपेक्षा जास्त दिवाळी फराळ वाटप

कोथरूड: कोथरुड मधील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी; यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला असून, या उपक्रमास कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामदार पाटील यांच्या माध्यमातून जवळपास १५ हजार किलोपेक्षा जास्त दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

Img 20231109 wa00128330767081325070842

कोथरुड मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी; या उद्देशाने दरवर्षी नामदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देतात. ना. पाटील यांच्या या उपक्रमामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिवाळी मध्ये मोठा आधार मिळातो. अनेकजण याचा लाभ घेत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतात.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

यंदाही चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीसाठी बाणेर, कोथरुड आणि कसबा मधील नागरिकांसाठी नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला. नामदार पाटील यांच्या माध्यमातून जवळपास १५ हजार किलोपेक्षा जास्त दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्यात आला.

Img 20231109 wa00081144410606180315579

चंद्रकांत पाटील यांच्या दरवर्षीच्या या उपक्रमावर कोथरुड मधील महिलांनी समाधान व्यक्त केले असून, नामदार पाटील यांचे कार्य निरंतर सुरू रहावे, अशा शुभेच्छा दिल्या.

Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये