पुणे शहर

कर्वेनगरमध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक..

कर्वेनगर : मोरया मित्र मंडळ कर्वेनगर पुणे यांच्या वतीने छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्त आज महाराजांच्या मूर्तीला पंचामृत आणि दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आले.

छत्रपती श्री संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज जगाच्या इतिहासातील एक पराक्रमी योद्धा, राजकारणी, साहित्यिक, रसिक आणि अभ्यासक  अशी ओळख छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी स्वराज्य विस्तार केला तसेच स्वराज्य आणि धर्म रक्षणासाठी त्यांचे बलिदान सर्वश्रुत आहे अशा छत्रपती श्री संभाजी महाराज यांना परिसरातील जेष्ठ नागरिक  यांच्या हस्ते छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी इतिहास संशोधक मंडळाचे अजीवन सदस्य मंगेश नवघणे, संस्थापक केदार मारणे, अध्यक्ष रोहिदास जाधव, उपाध्यक्ष रोहित दानवले, ऋषिकेश जगताप, संदिप शितोळे, स्वप्नील मारणे आणि मंडळाचे कार्यकर्ते  उपस्थित होते.‌

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978
Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये