पुणे शहर

टेकडीवर जाणारा रस्ता बंद झाल्याने वृक्ष संवर्धन व व्यायाम झाला बंद : भुसारी कॉलनीतील नागरिकांमध्ये नाराजी

आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेविका अल्पना वरपे यांच्याकडून पालीकेकडे रस्ता सुरू करण्यासाठी पाठपुरावा

कोथरूड : उजवी भुसारी कॉलनीतून टेकडीवर जाणारा रस्ता बंद झाल्याने टेकडीवर व्यायामासाठी व वृक्ष संवर्धन करण्यासाठी जाणाऱ्या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. टेकडीवर जाण्यासाठी रस्ता महापालिकेने सुरू करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चांदणी चौक पासून ते मेट्रो डेपो पर्यंत स्टेशन पर्यंत टेकडीलगत वसलेल्या उजवी भुसारी कॉलनी व परिसरातील नागरिक रोज सकाळी व्यायाम करण्यासाठी टेकडीवर जात होते. यात ज्येष्ठ नागरिक व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. टेकडीवर मिळणाऱ्या शुद्ध हवेमुळे व्यायामासाठी या भागातील बहुतांशी नागरिक सकाळी आणि संध्याकाळी टेकडीवर जाण्यासाठी प्राधान्य देत होते. टेकडीवर असणाऱ्या मारुती मंदिर, देवीचे मंदिर, म्हातोबा टेकडीवर असणाऱ्या म्हातोबाचे मंदिरामुळे टेकडीवर भक्तीमय वातावरण असल्याने नागरिकांना प्रसन्नतीची अनुभूती मिळायची. नागरिकांनी या टेकडीवर स्वखर्चाने झाडे लावून ती जपलेली आहेत. पण आता काही महिन्यांपासून भुसारी काॅलनी येथून असणारा या टेकडीवर जाण्याचा रस्ता हा बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

न्यू इंडिया स्कूल बाजूला नव्यानेजी काही बांधकामे चालली त्यांनी आपले कंपाउंड केल्याने टेकडीवर जाण्याचा रस्ता बंद झाला असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. नागरिकांची होणारी गैरसोय पाहता  महानगरपालिकेने टेकडीकडे जाणारा अधिकृत रस्ता तेथील नागरिकांकरिता त्वरित खुला करावा अशी मागणी स्थानिक आमदार भिमराव तापकीर व माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी आयुक्तांकडे केली आहे.   या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी तातडीने पथ विभागाचे मुख्य अभियंता यांना त्याबाबत सूचना केल्या आहेत. यावेळी वनचारी व ग्रीन हिल्स ग्रुपचे श्रीकांत पवार,मकरंद शेटे,राहुल जाधव,बन्सी बोंबे,प्रदिप वाटकर,मंगेश नाडकर्णी, हेमंत मोहिते यांनी सुद्धा रस्ता लवकर करावा व अवैध टेकडीफोड त्वरित थांबवावी अशी मागणी केली.

Img 20250506 wa01402299616813560392461

रस्ता सुरू करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असला आता रस्ता कधी सुरू होणार हे पाहावे लागणार आहे. या संदर्भात गणेश वरपे यांनी सांगितले की प्रशासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेतली आहे. नागरिकांना टेकडीवर जाण्यासाठी रस्ता कसा उपलब्ध करून द्यायचा याबाबत त्यांचे नियोजन सुरू असून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत.

Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये