पुणे शहर

अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘मिशन निर्मल’ स्वच्छता अभियानाचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे तसेच पुणे महानगरपालिका व आदर पूनावाला यांच्या सहकार्याने आणि स्वच्छ पॅनकार्ड रोड अभियानाच्या समन्वयाने प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी -सुस-म्हाळुंगे-पाषाण- सुतारवाडी-सोमेश्वरवाडी भागात “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानचा शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते व भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या अभियानात विशेष उपक्रम म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा “स्वच्छतादूत” म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच वाहतूक कोंडीतून सुटका करून नागरिकांना मदत करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डन टिमचाही सन्मान करण्यात आला.यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील व भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी अमोल बालवडकर फाऊंडेशन ने सुरु केलेल्या या “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

Img 20250508 wa00011184667503723765598

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी हा परिसर संपूर्ण पुणे शहरामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावरती येईपर्यंत “मिशन निर्मल” हा उपक्रम निरंतरपणे सुरू राहणार असल्याचे मत यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या परिसराला अधिक स्वच्छ व सुंदर बनवावे, असे आवाहनही अमोल बालवडकर यांनी केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर भाऊ तापकीर, प्रकाशतात्या बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, कोथरुड(उ.) मंडल अध्यक्ष लहु बालवडकर, गणेश कळमकर,राहुल कोकाटे, शशिकांत बालवडकर,सचिन पाषाणकर,अनिकेत चांदेरे,काळुराम गायकवाड,शरद भोते, राजेंद्र पाडाळे,सुहास भोते, शशिकांत बालवडकर,उमा गाडगीळ,  अस्मिता करंदीकर,कल्याणी टोकेकर,निकीता माताडे,वैशाली कमाजदार,जागृती विचारे,मिना पारगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच कोथरूड उत्तर मंडलातील पदाधिकारी, पॅनकार्ड क्लब रोड स्वच्छता अभियानाचे सदस्य, सर्व मनपा आरोग्य निरीक्षक व स्वच्छता कर्मचारी, अमोल बालवडकर फाऊंडेशन, ट्रॅफिक वॉर्डन टिम, अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये