माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडुन “मराठवाड्यासाठी आपुलकीची दिवाळी” साजरी….

मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते १५ हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम साहित्य वाटप
अमोल बालवडकर यांच्याकडुन आपला मराठवाडा सेवा संघाची स्थापना
पुणे : यंदा अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जनतेवर मोठं संकट ओढवलं आहे. दिवाळी हा आनंदाचा सण असूनही अनेक कुटुंबांवर दुःखाचं सावट पडलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी “मराठवाड्यासाठी आपुलकीची दिवाळी” साजरी करण्याचा सुंदर निर्णय घेत, १५ हजार कुटुंबांना दिवाळी साहित्य वाटप केले.
या प्रसंगी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे-पाटील, भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह,भाजपा कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, ज्ञानेश्वर तापकीर यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदा अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जनतेवर मोठं संकट ओढवलं आहे. दिवाळी हा आनंदाचा सण असूनही अनेक कुटुंबांवर दुःखाचं सावट पडलं आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी “आपुलकीची दिवाळी” साजरी करण्याचा सुंदर निर्णय घेत, १५ हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम साहित्य वाटप केले. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.



रावसाहेब दानवे पाटील म्हणाले, अमोल बालवडकर सलग 10 वर्षे दिवाळी सरंजाम उपक्रमातून या भागातील लोकांची सेवा करीत आहे. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात अनेक लोक निवडणुकीच्या तोंडावर कार्यक्रम घेताना मी पाहिले आहे पण अमोल बालवडकर सलग 10 वर्षे हा उपक्रम राबवित लोकांची सेवा करीत प्रेम व्यक्त करत आहे. आता येणाऱ्या निवडणूकीत लोकांनी देखील मतदान करून अमोल वर प्रेम व्यक्त करावे.
आपला मराठवाडा सेवा संघाची स्थापना



अमोल बालवडकर म्हणाले, मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, रावसाहेब दानवे पाटील यांनी या संकट काळात राज्यातील भाजप कार्यकर्त्यांना मदतीच्या सूचना केल्या होत्या.त्यानूसार मदतीस सुरूवात झाली आहे. आता रेशनकार्ड कुठलही असू द्या. पुणे महानगरपालिकेच्या सुविधा तुमच्यासाठीपण… मी काल कर्तव्य म्हणून ‘आपला मराठवाडा सेवा संघाची स्थापना महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते केली.आपल्या विविध मागण्यांसाठी आदरणीय चंद्रकांत दादांनी पुणे मनपा आयुक्तांना लगेचच फोन केला आणि माझ्या मराठवाड्याच्या व महाराष्ट्रातील इतर विभागातील कष्टकरी कामगार यांची चिंता मिटली.






मराठवाड्याच्या माझ्या सहकाऱ्यांनो तुमच्या सुख दुःखात आम्ही सोबत आहोत.तुम्हाला आधार देणं आता आमची जबाबदारी आहे. तुमच्यासाठी लढत आलो, लढत राहणार. पुणे महानगर पालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात दीड लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत होणार आहेत. तसेच अशा अनेक लोकाभिमुख योजनांचा लाभ घेता येणार आहे.आज तुमच्यासाठी एक पाऊल उचलले आणि सार्थकच झालं. नका काळजी करू आम्ही आहोत. असे अमोल बालवडकर म्हणाले.












