पुणे शहर

वाघोलीत भरधाव कार डिव्हायडर ओलांडून ट्रकवर आदळली; तिघांचा जागीच मृत्यू , दोघे गंभीर जखमी

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात

पुणे : वाघोली परिसरातील पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

Screenshot 2026 1119 1009536682663007404979299

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास वाघोली येथील फूलमळा रोड परिसरातील पाच तरुण फोक्सवॅगन पोलो कार (क्र. MH 12 KE 4174) मधून पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरून लोणीकंदच्या दिशेने जात होते. यावेळी विठ्ठलवाडी कमानीजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार डिव्हायडर ओलांडून उलटली आणि सुमारे ६० ते ७० मीटर पुढे जाऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. MH 16 BC 8174) धडकली.

अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने वाघोली येथील आय मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ओमकार अजय सूर्यवंशी (वय २४), शंकर वासुदेव ढोळे (वय २२) आणि मयूर सतीश औटी (वय २७) यांना मृत घोषित केले. त्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

या अपघातात आशुतोष नंदकुमार मरकड (वय २८) आणि प्रणय भरत शिंदे (वय २४) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर आय मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते शुद्धीवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या भीषण अपघाताची माहिती वाघोली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये