कोथरूड विकासकामांसाठी नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

पुणे : कोथरूड मतदारसंघातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांबाबत नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी आज सर्किट हाऊस येथे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या प्राधान्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली.
नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी कोथरूड परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, सार्वजनिक सुविधा आणि इतर प्रलंबित कामांचा आढावा घेतला. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या वेळेत सोडविण्यासाठी आणि प्रत्येक भागात आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचे सविस्तर निवेदन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या निवेदनाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मार्गदर्शन केले. कोथरूडच्या विकासाला अधिक गती मिळावी आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने मार्गी लागाव्यात, याबाबत त्यांनी सहकार्याची तयारी दर्शवली.
नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी म्हणाले, सुनेत्रावहिनी यांनी दिलेले मार्गदर्शन आणि सकारात्मक प्रतिसाद पुढील कामांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांना वाटतो.या भेटीतून कोथरूड मतदारसंघातील विकासकामांना चालना मिळेल आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर शासन स्तरावर लक्ष केंद्रित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने प्रयत्न करत राहण्याची भूमिका स्पष्ट केली.



