पुणे शहर

पुण्यात सोमवार पासून निर्बंध शिथिल होणार ; अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातील निर्बंध शिथिल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्य सरकारनं राज्यातील 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता दिली. मात्र, पुण्यात लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यानंतर पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गानी नाराजी व्यक्त केली.(Restrictions will be relaxed in Pune from Monday; Meeting begins in the presence of Ajit Pawar)

यावेळी पुण्यातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असतानाही व्यापाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून आपली दुकाने संध्याकाळपर्यंत सुरु ठेवली. या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यातील निर्बंधासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक पार पडल्याचं समजतंय. या बैठकीत पुण्यातील दुकाने संध्याकाळी 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज अजित पवार पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत उघडी राहू शकतात. जर पुण्यातील निर्बंध शिथील केल्यास सोमवारपासून पुणेकरांसाठी निर्बंधाची नवी नियमावली लागू होईल.

उत्तमनगर भागातील गॅरेजला भीषण आग,दोन बस जळून खाक; पहा व्हिडिओ

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये