पुण्यात भाजप आणि कॉग्रेसमध्ये फ्लेक्सवॉर; अभिमान प्रगतीचा विरुद्ध झूठ बोले कौआ काटे

पुणे : पुणे शहरामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्यावतीने स्मार्ट सिटी अभिमान प्रगतीचा असे फलक लावले आहेत. मात्र शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हा विरोधाभास समोर आणत कॉग्रेस पक्षाच्या वतीने भाजपाच्या फलकाजवळच झूठ बोले कौआ काटे अशा आशयाचा फलक लावून पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे.(Flexwar between BJP and Congress in Pune)

याबाबतीत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय बालगुडे म्हणाले, पुणे शहरात बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात खोदाई कामे बंद ठेवण्यात येतात. मात्र पुण्यात सर्वत्र खोदाईची कामे सुरू असल्याने रस्ते खराब झाले आहेत. मात्र सत्ताधारी भाजप पक्षाच्या वतीने स्मार्ट सिटी अभिमान पुण्याचा असे फलक लावणे म्हणजे पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.
https://youtube.com/shorts/YKiC3v3Q4xw?feature=share



आठ दिवसांपूर्वी रस्त्याची सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिले होते. मात्र अद्यापही कामास सुरुवात न झाल्याने आंदोलन म्हणून आम्ही भाजपच्या फलका जवळच फलक लावून आंदोलन सुरू केले असल्याचे बालगुडे यांनी सांगितले.



