महाराष्ट्र

अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेता बनवा : शिवसेना

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरेंचा उल्लेख केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना रश्मी ठाकरे कधी राजकारणात नसताना त्यांचं नाव चंद्रकांत पाटील टीका करताना का घेतात असा सवाल उपस्थित केला आहे. सतत प्रकाशझोतात असणाऱ्या अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेता बनवा असा खोचक सल्लाही शिवसेनेने दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन टोला लगावला. रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्री पद जाईल अशी शक्यता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील मोठे नेते आहेत. पण कधी कधी मला त्यांची किव करावीशी वाटते. चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ”माझ्यासारख्यांनी त्यांच्याबद्दल असं बोलणं चुकीचं आहे असं माझे संस्कार सांगतात. इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी नाही बोललं पाहिजे असे माझ्या पालकांचे, गुरुंचे आणि बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण ते जर एक पत्नी म्हणून रश्मी उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर अमृता फडणवीस यांना ते विरोधी पक्षनेता करणार आहेत का हे सांगावे. कारण अमृता फडणवीस या जास्त प्रकाशझोतात आहेत. रश्मी वहिनी कधीच प्रकाशझोतात नसतात तरी त्यांचं नाव घेतलं जातं,” एक वेळ आदित्य ठाकरेंचं नाव घेणं समजून शकते ते मंत्री आहेत. पण रश्मी वहिनींचं नाव का घेता? त्यात तर कधीच नसतात. तुमच्या फडणवीस बाई आहेत ना त्या प्रकाशझोतात आहेत. मग त्यांना बनवा ना विरोधी पक्षनेता. महिलांची नावं कशाला घेता. हे अजिबात चालू देणार नाही. हे काय चाललंय. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी किती खाली आणणार आहात? भारतीय जनता पक्ष हिंदू म्हणून पुढे येतो पण महिलांचं हनन करणं ही हिंदू संस्कृती नाही,” असं पेडणेकर यांनी नमूद केले.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये