पुणे शहर

स्नेह पॅराडाईज सोसायटीसमोरील रस्त्याच्या कामाचा दीपक मानकर, हर्षवर्धन मानकर यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : प्रभाग क्र. ३० मधील रामबाग कॉलनीतील स्नेह पॅराडाईज सोसायटीच्या नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन नगरसेवक दीपक मानकर यांच्या प्रयत्नातून सोसायटी समोरील डांबरीकरण करण्यात येत आहे. येथील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला शुभारंभ नगरसेवक दीपक मानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सोसायटीच्या हॉलमध्ये नागरिकांशी संवाद साधत असताना हर्षवर्धन मानकर म्हणाले, कोरोना काळात माझे वडील नगरसेवक दीपक मानकर व दीवा प्रतिष्ठानच्या वतीने मोठी मदत करण्यात आली. संकटाच्या काळात नागरीकांच्या मदतीसाठी धावून नागरीकांना मदत करता आल्याचे समाधान आहे. सोसायटीला टँकर मुक्त करण्यासाठी पाईपलाईन टाकणे, वस्ती विभागासह सोसायटी विभागातील पाणी, रस्ते, विजेच्या समस्या सोडविण्यासाठी केलेली कामे पूर्ण झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटले.

याप्रसंगी स्नेह पॅराडाईज फेडरेशनचे अध्यक्ष काका बलकवडे, सेक्रेटरी राम सोनार काका, सोसायटीमधील एल बिल्डिंग चे अध्यक्ष विवेक शहा, जे बिल्डिंग चे अध्यक्ष समीर कुलकर्णी, के बिल्डिंग चे अध्यक्ष श्रीकांत देव, विनायक देवल,  आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45
Img 20220225 wa00035521681856149145908

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये