रशियाची कोंडी ; युक्रेनवरील हल्ल्याचे दुष्परिणाम!

रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात खळबळ जनक परिस्थिती असून विविध क्षेत्रांमध्ये त्याचा परिणाम होत आहे. आता क्रीडा क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येत आहे. रशियाने युक्रेनशी युद्ध पुकारले आणि युक्रेनवर हल्ला केला. आज युद्ध सुरू होऊन सहा दिवस झाले असून त्याचे पडसाद अर्थव्यवस्था, जागतिक वाहतुकी सह सर्वच क्षेत्रांवर होत आहेत. आता क्रीडा विश्वात रशियाची कोंडी करण्यास सुरवात झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया युक्रेन वादामुळे अनेक चर्चांना उधाण आलं असून बऱ्याच देशांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे याचा फटका बसत आहे. भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात झालेला मृत्यू हे त्याचेच एक उदाहरण आहे.
परंतु आता रशियाचीच क्रीडाविश्वात कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. रशियाला अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून बाहेरचा मार्ग दाखवला गेला आहे.
यामध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक, फॉर्म्युला वन शर्यत, युएफा चॅम्पियन लीग या स्पर्धांचा समावेश आहे. त्यामुळे क्रीडा-विश्व रशिया आणि उर्वरित जग अशा दोन गटात विभागले जाण्याची शक्यता आहे. रशियाचा यूक्रेन वरील हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी रशियातील प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियम सेंट पीटर्सबर्ग येथे होणाऱ्या चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्याचा ठिकाण बदलून पॅरिस करण्यात आलं. त्यानंतर काहीच काळात प्रसिद्ध रेसिंग स्पर्धा फॉर्म्युला वन रशियन ग्रँड स्पर्धा रद्द करण्याचं ट्विटर द्वारे समजलं. एकंदरीतच बऱ्याच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये रशियावर बंदी.
•फुटबॉल विश्वचषक फिफाकडून (FIFA) आगामी विश्वचषकात बंदी
•युरोपियन फुटबॉल असोसिएशनची अर्थात युएफाकडून (UEFA) बंदी
•ज्युदो महासंघातून पुतीन बडतर्फ
•रशियातील स्कीईंग
फॉर्म्युला वन शर्यत रद्द.
•चॅम्पियन्स लीग फायनलचं यजमानपद रशियाकडून पॅरिसकडे.
•जागतिक अॅथलेटिक्समध्येही रशियावर बंदीची शक्यता



