पुणे शहर

लोणी काळभोरमध्ये सेफ्टी टँकमध्ये पडून 4 जणांचा गुदमरून मृत्यू

पुणे : लोणी काळभोर (Pune News) येथे सेप्टी टँकची स्वच्छता करताना चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदतीसाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना मृतदेहांना टाकीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

एका इमारतीच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते. त्या इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये सुरूवातीला दोघे जण स्वच्छतेसाठी उतरले. त्यानंतर त्या दोघांना गुदमरू लागल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. लगेच त्यांच्याबरोबर असलेल्या ठेकेदार रुपेश कांबळेने त्यांना वाचवण्यासाठी हात दिला अन् तोही टँकमध्ये पडला. त्यानंतर तिघांनीही आरडाओरड सुरू केली. हा आवाज ऐकू आल्याने तिथला एक व्यक्ती त्यांना वाचवण्यासाठी गेला असता तो देखील पडल्याने या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांना ही बातमी समजल्यावर त्यांनी तेथे धाव घेत चौघांपैकी एकाला बाहेर काढले. परंतू तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत त्यांना राहिलेल्या तीन मृतदेहांना बाहेर काढले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये