पुणे शहर

बालेवाडीमध्ये अमोल बालवडकर आणि बाबूराव चांदेरे यांचा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा…

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ बाणेर-बालेवाडी, पाषाण मधून विजयी झालेल्या अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.संजय फार्म, बालेवाडी येथे आयोजित या कार्यक्रमात प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिक, हितचिंतक, कार्यकर्ते तसेच मित्र-परिवार उपस्थित होते. या सत्कार सोहळ्याद्वारे दोन्ही विजयी नेत्यांना अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या गेल्या.

अमोल बालवडकर यांनी या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या तिकीटावर भाजप उमेदवार लहू बालवडकर यांचा ९०३ मतांच्या फरकाने पराभव केला. तर बाबुराव चांदेरे यांनीही त्याच प्रभागातील आपल्या जागेवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत प्रभागातील प्रत्येक नागरिकाने दिलेला विश्वास, प्रेम आणि मोलाची साथ हाच या यशामागील मुख्य ताकद असल्याचे दोघांनीही सांगीतले.

Img 20251125 wa01782121520512185783132

अमोल बालवडकर यांनी सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त केला. हे यश फक्त आमचे नाही, तर प्रभागातील प्रत्येक नागरिकाचे आहे. यापुढेही विकास आणि सेवेसाठी पूर्ण निष्ठेने काम करू,नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मी पुन्हा विजयी झालो आहे. या प्रभागातील अनेक प्रलंबीत कामे आता मार्गी लागतील. निधीची कोणतीही कमी पडणार नाही. कारण अजितदादा आपल्या पाठीशी आहेत. असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये