कोथरुडपुणे शहर

कोथरूडमध्ये आईने पोटच्या 4 वर्षाच्या मुलाला एक लाखाला विकले, आरोपींना अटक

पुणे : पनवेलमधील एका जोडप्यास एक लाख रुपयांना आपल्या मुलाला विकून त्याचे अपहरण झाल्याचा बनाव केला गेला पण त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर  कोथरूड पोलिसांनी 24 तासांत हा प्रकार उघडकीस आणत मुलाची सुटका केली आहे. यातील आरोपींना  अटक करण्यात आली आहे. मध्यस्थाने या मुलाला आणखी दुसऱ्या कुटुंबाला एक लाख 60 हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

मुलाची विक्री केल्याचा कोणाला संशय येवू नये म्हणून त्यांच्या आईने मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा प्रकार उघडकीस आला. मुलाच्या आईने जन्नत बशीर शेख आणि रेश्‍मा सुतार यांच्या मदतीने मुलाची विक्री केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. कोथरूड, वारजे आणि उत्तमनगर पोलिस ठाण्यामधील तपास पथकामार्फत मुलाचा शोध घेण्यात येत होता.

Img 20220206 wa00011502175928892672051

पळवून नेलेला मुलगा घटनेच्या दिवशी दुपारी त्याच परिसरात राहणाऱ्या बांगडीवाली भाभीसोबत होता, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यानुसार बांगडीवाली भाभी जन्नत शेख (रा. जळकेवस्ती, कोथरूड) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास करण्यात आला. मात्र तिने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी कोथरूड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक आकाश वाल्मीकी आणि विशाल चौगुले यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला एका मुलास घेऊन जात असल्याने त्यांना दिसून आले. त्यामुळे जन्नत हिच्याकडे पुन्हा कसून सखोल तपास केला असता तिने गुन्हा केल्याचे कबूल केले.

जन्नत हिने रेश्मा आणि प्रियांका यांच्याशी संगनमत व कट करून मुलाला मध्यस्थ असलेल्या तुकाराम निंबळे (रा. मावळ) याच्यामार्फत चंद्रकला माळी आणि भानुदास माळी (रा. बोर्लेगाव, पनवेल) यांना १ लाख रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले.

पनवेलमधील जोडप्याला मुलाची विक्री झाल्याने कोथरूड पोलिसांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्याशी संपर्क करून त्यांना चंद्रभागा माळी व भानुदास माळी यांना ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांनी मुलास एक लाख 60 हजार रुपयांना दीपक तुकाराम म्हात्रे व सीताबाई दीपक म्हात्रे (रा. केळवणे, पनवेल) यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी केळवणे येथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले व आरोपींना अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये