हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अमोल बालवडकर मित्रपरिवाराचा स्नेहमेळावा संपन्न….

पुणे : नूतन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने हायस्ट्रीट मैदान, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेला स्नेह मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला.
बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी भागातील हजारो नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून या स्नेह मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या स्नेहमेळाव्यामध्ये सर्वांच्या उपस्थितीत अमोल बालवडकर यांच्या दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन करण्यात आले.

अमोल बालवडकर म्हणाले, याप्रसंगी प्रभागातील विकासकामे, नागरिकांसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम आणि पुढील वाटचालीचा संकल्प यावर मनमोकळा संवाद झाला. नागरिकांकडून मिळालेला प्रेमळ प्रतिसाद, विश्वास आणि पाठबळ हेच पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारे ठरले.
शिवाय आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने देखील आमचा पाठिंबा आपल्यासोबत राहील हा विश्वास नागरिकांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होता, या गोष्टीचे विशेष समाधान वाटले. कारण यातूनच खऱ्या अर्थाने केलेली विकासकामे आणि राबविलेले उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचल्याची एकप्रकारे खात्री मिळते. आपुलकी, एकजूट आणि सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरलेला हा स्नेह मेळावा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. असेही अमोल बालवडकर म्हणाले.



यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यापीठ भाग कार्यवाहक संजयजी वाघुळदे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बालवडकर, कोथरुड उत्तर मंडलाचे अध्यक्ष लहु बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाशतात्या किसन बालवडकर, भाजपा नेते सुहास भोते, प्रियंका चिव्हे, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, माजी उपसरपंच काळुराम गायकवाड, युवा नेते अनिल ससार, अॅड शिवाजीराव जांभुळकर, हिंजवडी विद्यमान सरपंच गणेश जांभुळकर, हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पै. अभिजित कटके उपस्थित होते. तसेच स्नेहमेळावा प्रसंगी भाजपा कोथरूड उत्तर मंडलाचे सर्व महिला पदाधिकारी, सर्व आघाडीचे सदस्य, कार्यकर्ते, सदस्य, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरीक, परिसरातील सोसायटीचे पदाधिकारी व अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.






