पुणे शहर

होय I love Kothrud पण फुटपाथवर नको; भाजप नगरसेविकेने सुशोभीकरणासाठी अडविला फुटपाथ

पुणे : प्रत्येक कोथरूडकराचे कोथरूड वर प्रेम आहे. आणि त्यांना कोथरूड मध्ये राहत असल्याचा अभिमान आहे. मात्र  पुणे महापालिकेच्या वतीने कोथरूडमधील भेलकेनगर चौकामध्ये चक्क फुटपाथवर अतिक्रमण करीत I love Kothrud आणि स्वराज्य शिल्प म्युरल बसविण्यात आले आहे. एकीकडे पादचारी दिन साजरा करण्याचे नियोजन पालिका करत असताना दुसऱ्या बाजूला फुटपाथ अडवून सुशोभीकरण करण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेच्या या विरोधाभासामुळे कोथरूडकर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. स्थानिक नगरसेविका वासंती जाधव यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून हे काम करण्यात आले आहे. पुणे शहरात पालिका पादचारी दिन साजरा करण्याचे नियोजन करत आहे. यापूर्वी नागरीकांना चालण्यासाठी फुटपाथ मोकळे करण्याऐवजी पालिकाच फूटपाथ अडवून सुशोभीकरण करीत असल्याने संताप व्यक्त केला आहे. फुटपाथवर पालिकेने या कामास मंजुरी कशी दिली ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या सुशोभीकरणा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य शिल्पाचे म्युरल बसविण्यात आले आहे. या म्युरलच्या वरील बाजूस स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे टाकण्यात आल्याने ही नावे हटविण्याची नावे शिवप्रेमी करत आहेत. या बाबतीत कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे म्हणाले,  नगरसेविका वासंती जाधव यांच्या वॉर्ड स्तरीय निधीतून हे काम करण्यात आले असून फूटपाथवर असले तरी ते पादचाऱ्यांना अडथळा ठरणार नाही. अशा पद्धतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या आलेल्या सूचनेनुसार त्यात लवकरच बदल केला जाईल.

वासंती जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये