भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर मारहाण प्रकरण; चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे : भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांना त्यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांविरूद्ध भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम 504, 323 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपींपैकी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेचा निषेध करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चौघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री केतकी चितळे यांच्या आक्षेपार्ह पोस्टवर राजकीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असतानाच शनिवारी पुण्यात ही घटना घडली होती.




