कोथरुडमध्ये गाड्यांच्या काचा फोडून सीडी प्लेअर चोरीला, पहा सीसीटिव्ही फुटेज ; पोलिसांचा तपास सुरू..

कोथरुड : pune city कोथरुडमधील गुजरात कॉलनी , जीत गाऊंड परिसरात रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या अनेक चारचाकी गाड्यांमधील सिडी प्लेअर चोरट्यांनी रात्री काचा फोडून चोरून नेले आहेत. CD player stolen by breaking car glass in Kothrud, see CCTV footage; Police investigation continues.
याबाबत कोथरुड पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी दिली आहे. Pune police
कोथरुड मधील गुजरात कॉलनी व परमहंस येथील जीत ग्राउंड परिसरात रस्त्याच्या कडेने चारचाकी वाहने लावलेली असतात. गुरवारी रात्री चोरट्यांनी या गाड्यांच्या काचा फोडून त्यामधील सिडी प्लेअर लंपास केले आहेत. दहा ते बारा गाड्यांमधील सीडी प्लेअर चोरीला गेल्याची चर्चा कोथरुड मध्ये असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून संबंधित चोरांना अटक करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
गाड्यांमधून सीडी प्लेयर चोरताना सीसीटीव्ही सिंहासन न्यूज च्या हाती लागला आहे.




