महाराष्ट्र

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षापदी चैत्राली शेलार

पुणे आणि मराठवाड्यात संघटनात्मक नियुक्त्या जाहीर!!!
मराठवाडा विभागीय महिला आघाडी अध्यक्ष पदाची पूजा चव्हाण यांना जबाबदारी

पुणे- शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चा राज्यभरात वेगाने विस्तार होत आहे. संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विचारांनी प्रेरित होऊन संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चैत्राली शेलार यांची ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’च्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षापदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आज (रविवार दि. 5 ) पुणे येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात संघटनेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी मराठवाडा आणि पुणे जिल्ह्यात महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Image editor output image 709320453 17832714679204074671773471745513

नवीन संघटनात्मक नियुक्त्या खालीलप्रमाणे
चैत्राली शेलार महिला प्रदेशाध्यक्षा महाराष्ट्र
पुजा चव्हाण – महिला अध्यक्ष, मराठवाडा विभाग
राजेंद्र ढमाले – जिल्हा अध्यक्ष, पुणे शहर
ॲड. अनिल भिलारे – जिल्हा अध्यक्ष, पुणे विधी आघाडी,
अमोल बोराडे – जिल्हा उपाध्यक्ष, पुणे शहर,
दिलीप लिंबळे – शहर संघटक पुणे शहर
ज्योतिराम पावले – भूम तालुका संघटक
तर सातारा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून विशाल लोमटे यांना नियुक्त करण्यात आले आहे.

Fb img 17803875442192531368419001118856

क्रांतिकारी शेतकरी संघटना ही केवळ एक संघटना नसून शेतकऱ्यांच्या घामाची आणि हक्काची लढाई लढणारे एक व्यासपीठ आहे. “शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देणे, सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला खंबीर पाठबळ देणे” हाच संघटनेचा मुख्य विचार आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हाच विचार तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील आणि अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, राज्य समन्वयक सचिन पांडुळे, राज्य उपाध्यक्ष जयवंत दहिभाते, डॉ. सिताराम शरणागत आणि राज्य कोअर कमिटी सदस्य राजेंद्र आबा मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, सांगली जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, धाराशिव जिल्हाध्यक्ष भास्कर वारे, लातूर युवा जिल्हाध्यक्ष प्रज्योत हुडे, सांगली युवा जिल्हाध्यक्ष मयूर गायकवाड, करमाळा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, माळशिरस तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख अजित गडदे, श्रीराम चलवाड, भाऊ केदारी, शिवम राऊत, मल्हारी कांबळे, सुनील दाशाळ, भाऊसाहेब मुंडे, कांतीलाल शिंदे, गौतम कांबळे, दत्ता किणीकर, विशाल ढोबळे, दिगंबर कर्वे, मारुती कसबे, बिभीषण शिंदे, आदेश कसबे, सावन गवळी यांच्यासह राज्यातील शेकडो सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संघटना आणि शेतकरी बांधवांकडून अभिनंदन केले जात आहे.

Image editor output image 707473411 1783271521125755212611467029490

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल उद्धव धुमाळे, सचिन वाघमारे तर कल्पना झोरे व अंजली केदारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन जयवंत दहिभाते, ॲड. अनिल भिलारे, ॲड. दत्तात्रय दहिभाते यांनी केले. गणेशकृपा सभागृह, कोथरूड, पुणे येथे हा कार्यक्रम पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये