पुण्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते लोकार्पण…

पुणे : pune city सी.एस.आर. अंतर्गत आर.ई.सी. फाउंडेशन, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहाय्याने पुणे महानगरपालिकेच्या दळवी रुग्णालयात बसविण्यात आलेल्या १,७०० लि. प्रतिमिनिट क्षमतेचे ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांचे हस्ते आज व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, शिवसेनेचे गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, गनगरसेवक आदित्य माळवे, सोनाली लांडगे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार,आशिष भारती, आरोग्य अधिकारी, शिवाजी लंके, अधीक्षक अभियंता तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या ६-७ वर्षांपूर्वी केवळ काही राज्यातच एम्सची सुविधा उपलब्ध होती. आज मात्र प्रत्येक राज्यात एम्स साकारण्याचे काम सुरु असून देशातील एम्सची संख्या आता ६ वरुन २२ पर्यंत पोहोचली आहे. एम्सचे सशक्त जाळे तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. शिवाय देशातील प्रत्येक राज्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे लक्ष्य आहे,
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘नागरिक समस्या घेऊन येतील आणि त्यानंतर काही पावले उचलली जातील, अशी सरकारकची मानसिकता नाही. या सरकारी मानसिकतेतून आम्ही पूर्णपणे बाहेर पडत आहोत. म्हणूनच आता आम्ही सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत’. कोरोना लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर काम करत ९३ कोटी डोसचा आकडा ओलांडला असून लवकर १०० कोटी डोस पूर्ण होणार आहेत, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. एरव्ही भारतात प्रति दिवसाला ९०० मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन तयार होत होता. मागणी वाढताच हे उत्पादन १० पटींनी वाढवले’.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने पावले टाकत असताना पुणे महापालिका ऑक्सीजनबाबत आत्मनिर्भर झाली आणि त्यातीलच एका प्लांटचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणे ही समाधानाची आणि पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. ऑक्सिजननिर्मितीत पुणे महापालिकेने नवा वस्तुपाठ घालून दिला असून भविष्यात ऑक्सिजनबाबतीत पुणे महानगरपालिका कोणावरही अवलंबून नसेल.









