महाराष्ट्र

मुळशी मधील खारवडे येथे भक्तिमय वातावरणात म्हसोबा मंदिरात घटस्थापना..

खारवडे : महाराष्ट्रातील मुळशी तालुका येथील खारवडे गाव खारवडे म्हसोबा देवस्थान तिर्थक्षेत्र खुप दिवसानंतर भाविकांना दर्शनासाठी आज खुले करण्यात आले . तब्बल दीड वर्षानंतर भाविकांना खारवडे म्हसोबा देवस्थान येथे देवाचं दर्शन मंदिरा मध्ये जाऊन घेता आले. यावेळी भाविकांचा जनसागर परिसरात लोटला होता.
खारवडे म्हसोबा देवाची पालखीत मिरवणूक काढून ढोल-ताशांच्या गजरात मंदिरात घटस्थापना करण्यात आली .

आजपर्यंत मुळशी तालुक्यातील खारवडे गावात अजूनही कोरोनाचा एकही पेशंट  सापडला नाही, ही देवाची कृपा म्हणावी म्हणून विश्वस्त आणि अध्यक्षा यांच्या वतीने देवाला साकडे घालण्यात आलं कि जागांवरच हे कोरोनाच संकट पूर्णपणे नाहीस होऊ दे तसेच सर्वांचे जीवन निरोगी आणि सुखमय होऊ दे .

Img 20211007 wa0005

यावेळी म्हसोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा मधुरा भेलके, उपाध्यक्ष दिनेश जोगावडे, सचिव शंकर मारणे, विश्वस्त वसंत मारणे, संभाजी गावडे सरपंच लक्ष्मण मारणे , उपसरपंच लता जोगावडे, शिवाजी मारणे, माऊली साळेकर, हर्षल मारणे, केदार मारणे, गुलाब मारणे, सचिन मारणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Img 20211005 wa0014

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये