पुणे शहर

कोथरूडमधील डीजे मुक्त दहीहंडीचे नागरिकांकडून कौतुक..सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत वाढली.

श्री तुळजाभवानी माता व राधाकृष्ण सेवा संस्था व समस्त गावकरी मंडळाची दहीहंडी मुंबईच्या संघर्ष दहीहंडी पथकाने फोडली

कोथरूड : उंच साऊंड च्या भिंती त्यातून येणाऱ्या कर्कशः आवाजाने  नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम यावर सातत्याने बोलले जातात आहे कोणतीही मिरवणूक असो किंवा उत्सव म्हटलं की सध्या साऊंड च्या भिंती उभारणे आणि हृदय हादरवून टाकणारा आवाज करणे हे एक फॅड झाले आहे, परंतु या सगळ्या गोष्टीला फाटा देत नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत कोथरूड मधील श्री तुळजाभवानी माता, राधाकृष्ण सेवा संस्था व  समस्त गावकरी मंडळ कोथरूड च्या वतीने करण्यात आलेली दहीहंडी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून डीजे मुक्त साजरी करण्यात आली.

श्री तुळजाभवानी माता व राधाकृष्ण सेवा संस्था व समस्त गावकरी मंडळ कोथरुडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक कोथरुड येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  डीजेचा दणदणाट बाजुला ठेऊन सर्व गोविंदा भक्तांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक निर्मित शोर मच गया शोर या गायन व नृत्याविष्कार कार्यक्रमाचा कोथरूडकरांनी मनमुराद आनंद लुटला.  या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक , महिला भगिनी व युवक युवती, गोविंदाभक्त सहकुटुंब सहभागी झाले होते. अशा पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यात आल्याने कोथरूडकारांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे.

Img 20250508 wa00018046597267745442111

कोथरुडचे प्रथम आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या संकल्पनेतुन ज्येष्ठ नागरिक व युवा पिढी या दोन्ही घटकांच्या आवडीचा विचार करुन त्याप्रमाणे सुवर्णमध्य साधत दहिहंडीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी देखील सहकुटुंब सहभागी होऊन या सांस्कृतिक पर्वणीचा मनमुराद आनंद घेतला.

याप्रसंगी गायक जितेंद्र भुरुक, राजेश्वरी पवार, शांताबाई फेम संजय लोंढे , रुपाली जाधव, गणेश मोरे, अश्विनी कुरपे, माधुरी भोसेकर, निवेदक महेश गायकवाड, नृत्य दिग्दर्शिका निकीता मोघे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या कलेचे सादरीकरण केले. तसेच प्रबोधन वाद्य पथकाने ढोल ताशांच्या गजरात वादनकलेचे सादरीकरण केले.

मुंबईच्या संघर्ष दहीहंडी पथकाने दहीहंडी फोडुन चषक व रोख रकमेचे पारितोषिक पटकावले.  निमंत्रक ॲड योगेश मोकाटे यांनी सर्व उपस्थित मान्यवर व गोविंदाभक्तांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक निलेश मोकाटे, प्रणित चव्हाण, राहुल माथवड, अमोल भगत, प्रकाश साबळे, महादेव तांबोळे, ओंकार मोकाटे, नयन खोमणे यांच्यासह समस्त गावकरी मंडळ कोथरुड चे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20240404 wa0013282295561886146142642027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये