५ व्या काशी यात्रेचे उद्या पुण्यातून होणार प्रस्थान..मागील यात्रांप्रमाणेच कौटुंबिक वातावरणात पार पडणार यात्रा ; किरण दगडे पाटील

कोथरूड : माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी आतापर्यंत ४ काशी यात्रांच्या माध्यमातून १५ हजार नागरिकांना काशी विश्वनाथ दर्शन घडवल्यानंतर आता ५ वी काशी यात्रा उद्या १८ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यभूमीतून शिवभूमीकडे प्रस्थान करणार आहे. या काशी यात्रेच्या माध्यमातून कोथरूड डेपो – बावधन भागातील नागरिकांना काशी विश्वनाथाचे दर्शन घडवले जाणार आहे.
हिंदू संस्कृतीत काशीविश्वनाथाची यात्रा ही अतिशय पुण्याची यात्रा मानली जाते. अशी ही पुण्याची काशी विश्वनाथाची यात्रा किरण दगडे पाटील यांनी हजारो नागरिकांना घडवली आहे. आतापर्यंत झालेल्या ४ यात्रांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाची काळजी ही कुटुंबाप्रमाणे घेतली गेली त्यामुळेच माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांचे नाव पुण्यातील आधुनिक श्रावणबाळ म्हणून आज घेतले जाते.
या आधी झालेल्या काशी यात्रांवरून आलेल्या नागरिकांनी किरण दादांनी काशी यात्रा आयोजित केली म्हणून आम्ही काशी विश्वनाथाचे दर्शन व्यवस्थित घेऊ शकलो अशा भावना व्यक्त केल्या होत्या तर घरच्या लोकांसारखी काळजी आणि स्वप्नवत वाटलेली यात्रा सफल झाल्याने ज्येष्ठांच्या डोळ्यात पाणी दाटून आल्याचे चित्र रेल्वे स्टेशनवर पाहिला मिळाले होते.

या यात्रेबाबत किरण दगडे पाटील म्हणाले आतापर्यंत केलेल्या चार काशी यात्रेत काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समाधान मिळत आले आहे. हे समाधान अबाधित ठेवण्यासाठी उद्या पाचव्या काशी यात्रेचे प्रस्थान होत आहे. काशी विश्वनाथाच्या दर्शनानंतर नागरिकांना मिळणारा आनंद मला सामाजिक कार्यात ऊर्जा देत आला आहे. मागील चार यात्रांप्रमाणेच या यात्रेचेही योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. मी स्वतः या यात्रेत नागरिकांसोबत असतो आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये आणि एका कौटुंबिक वातावरणात त्यांचे काशी विश्वनाथाचे दर्शन व्हावे यासाठी मी व माझे सर्व सहकारी प्रयत्न करत असतो.






