शिवसेना आणि शिवसाई संस्थेच्या वतीने आयोजित मराठमोळ्या लावणी आणि लकी ड्रॉ कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

नागरिकांच्या सुविधेसाठी आधार कार्ड अपडेट कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : शिवसेना आणि शिवसाई संस्था यांच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये महिलांसाठी मराठमोळ्या लावणीचा आणि भव्य लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांपैकी पाच भाग्यवान महिलांना लकी ड्रॉ चे बक्षिस देण्यात आले.
प्रथम विजेते सौ. अत्रे यांना लकी ड्रॉ मध्ये 32 इंच टिव्ही बक्षीस प्राप्त झाले. तर द्वितीय विजेते श्रीमती पवार यांना कुलर बक्षीस मिळाले. यासोबतच गॅस शेगडी, मिक्सर आणि शेगडी, नॉन स्टिक क्रोकरी अशी विविध बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक शहर प्रमुख गजानन थरकुडे ,संघटक उमेश भेलके, संदीप मोकाटे, मारूती वर्वे, संतोष बबन दिघे, रामभाऊ दिघे, विनोद जोगले, अक्षय वर्वे, विजय पालांडे, शारदा विर, प्रकाश दिघे, अनिल बिडलान, हे होते तसे कार्यक्रमाचे आयोजक जयदीप पडवळ यांनी केले.
नागरिकांच्या सुविधेसाठी आधार कार्ड अपडेट कार्यक्रमाचे आयोजन
शिवसेना आणि शिवसाई संस्था यांच्या वतीने आधारकार्ड अपडेट चा कार्यक्रम शिवसेना शाखा आयडीयल कॉलनी पौड रोड येथे आयोजित करण्यात आला होता . या वेळी माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, आयोजक जयदीप पडवळ, शिवदूत बराटे, जानोरकर आदी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मारुती वर्वे, ज्ञानेश्वर दिघे, सुधीर चौधरी, अक्षय वर्वे,श्रीपाद चिकने, विनोद जोगळे, संतोष पडवळ,गणेश सोनावणे, चंद्रकांत पवार, आदी प्रमूख मान्यवर उपस्थिती होते. शिबिरात १५० लोकांनी सहभाग नोंदवला होता. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वृक्ष संवर्धन समितीचे माजी सभासद जयदीप पडवळ यांनी केले होते.












